श्री शैलम ज्योर्तिलिंग आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्हयात नंदीकोत्कूर या तालुक्यात आहे. ज्योर्तिलिंगाच्या भोवतालचा 80 कि. मी. चा परीसर घनदाट जंगल, उंच डोंगर व दऱयांनी सुशोभित आहे. उत्तुंग डोंगरावर अवस्थित मल्लिकार्जुन ज्योर्तिलिंग मंदिराच्या उत्तरेस कृष्णा, भिमा, तुंगभद्रा, भोगावती, कुंभी आणि शिवा या सहा नद्यांचे पाणी अडवून बांधलेले 125मीटर उंचीचे भव्य, दगडी, नागार्जून सागर धरण.
ज्योर्तिलिंगाच्या मंदिराच्या भव्य महादारातून आत प्रवेश केल्यावर एकूण चार प्रवेशद्वार आहेत. 1) श्री कृष्णदेवराय द्वार 2) श्री हरिहर राय द्वार 3) श्री ब्रम्हानंद राय द्वार 4) श्री शिवाजी महाराज द्वार.
कृष्णा नदीलाच तिकडे पाताळगंगा असे गुढ नामाभिधान आहे. पाताळगंगेच्या 600 पायऱया उतरून उजव्या हाताला श्री दत्तात्रयाचे मंदीर आहे. पाताळगंगेत उतरताना समोर तीन उंच पर्वत दिसतात. पूर्वेस ब्रह्मगिरी, पश्चिमेस शिवगिरी व दक्षिणेस विष्णूगिरी हे तीन उत्तुंग पर्वत एकत्र आलेले आहेत.
1) शैल्यापासून पाताळगंगा (कृष्णा नदी) येथे जाण्यासाठी रिक्षा करावी लागते. साधारणत 10 ते 20 रुपये घेतात.
2) पाताळगंगा पार करण्यासाठी दोन मार्ग आहेत. साधारणत 24 किलोमीटरचे अंतर आहे.
3) ट्रॉलीमधून जाण्यासाठी साधारण 50 रुपये घेतात.
4) होडीने प्रवास करण्यास साधारणत 1 ते 2 तास लागतात व प्रत्येकी 15 ते 20 रुपये घेतात.
पाताळगंगेच्या किनारी पोहोचल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी डोंगर चढल्यानंतर एक लहानशी गुहा लागते. तेथे अक्कमा महादेवीची येथे बरीच वर्षे तपश्चर्या व तेथे शंकराची पिंड आहे. या गुहेच्या वर अजून एक लहान गुहा आहे. त्या गुहेमध्ये गणेश्वर अवधूताने साधारणत 25 वर्षे तपश्चर्या केली व सध्या यांचे वास्तव्य बिंदर या ठिकाणी आहे. त्यांचे काही शिष्य येथे राहतात.
पहिली महत्त्वाची गुहा साधारणत 8 ते 10 किलोमीटर असून जाण्याचा मार्ग जंगलामधून आहे. जाताना मार्ग कठीण असल्यामुळे वाटेत 5 ते 6 फुटांची वारूळे पहायला मिळतील साधारणत हा प्रवास 4 ते 5 तासांचा असून ही पहिली गुहा साधारणत 100 फूट लांब, 30 फूट रुंद व 10 फूट उंचीची आहे. साधारणत 150 ते 200 लोक येथे बसू शकतात. या गुहेमध्ये 1) एक अक्कमा महादेवीची, 2) नरसिंह सरस्वती, 3) गणेश्वर अवधूत व इतर मुर्त्या आहेत. येथे बरचे साप, विंचू, उंदीर फिरत असतात. दुसऱया गुहेमध्ये जाण्यासाठी साधारणत 4 ते 6 तास लागतात. डोंगर सरळ उभे असल्यामुळे चढणे कठीण आहे. साधारणत 6 डोंगर ओलांडावे लागतात व अंदाजे 4 ते 6 किलोमीटरचा प्रवास आहे.
या गुहेमध्ये शंकराची पिंड, दत्तमहाराजांची मुर्ती व अक्कलकोट स्वामींचा फोटो व इतर मुर्त्या तसेच फोटो आहेत. |